दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेचा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन. | Sakal |

2021-04-28 414

दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यापासून शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत परंतु निगरगट्ट केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनाची तिळमात्रही चिंता नाही.याउलट शेतकऱ्यांचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी केंद्र सरकार नानाविध क्लुप्त्या लढवत आहे.या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने माहूर किनवट तालुक्याच्या मध्यभागी राष्ट्रीय महामार्गावर सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वाई बाजार येथे तब्बल दोन तास चक्का जाम आंदोलन केले.शिवाय शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारने बहुमताच्या बळावर पारित केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली.आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
(व्हिडिओ:साजीद खान,माहूर जि.नांदेड.)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires